शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी घटना ९वीच्या विद्यार्थीनीवर अत्याचार अंबाजोगाई शहरामध्ये
Ganesh Bade / December 18, 2019
प्लीज शेअर करा आणि त्या मुलीला न्याय मिळवून द्या
असं जर चालत राहिलं तर कसं पालकांनी आपल्या मुलीला शिक्षणासाठी घराच्या बाहेर पाठवायचं
जर शिक्षकच भक्षक होऊन बसले तर कोणावर विश्वास ठेवायचा
भारतीय शिक्षक प्रसारक मंडळाच्या श्री खोलेश्वर माध्यमिक विद्यालयातील क्रीडा शिक्षकाचा प्रकार
अंबाजोगाई/बीड(रोहिदास हातागळे): अंबाजोगाई शहरामध्ये शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून क्रीडा शिक्षकाने ९वीच्या विद्यार्थीनीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आल्याने शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली आहे.
अंबाजोगाई शहरातील भारतीय शिक्षण प्रसारक मंडळाच्या खोलेश्वर माध्यमिक विद्यालयात ९ वीमध्ये शिक्षण घेणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर याच शाळेच्या क्रीडा शिक्षक नराधमाने बलात्कार केल्याचे उघड झाले असून आरोपी शिक्षक शाम दिगंबर वारकड(वय४३) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यात
गुरनं.५४५,पोक्सो कायद्याचे कलम ४,६,८,१२ आणि भादवि ३७६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिकचा तपास डिवायएसपी राहुल धस करत आहेत.
खोलेश्वर माध्यमिक विद्यालयाच्या क्रिडा शिक्षकाने मुलीला क्रिडा स्पर्धेत खेळण्यासाठी दिवाळीपुर्वी जालना येथे नेले होते.क्रिडा स्पर्धेमधून परत आल्यानंतर त्या मुलीला अंबाजोगाई येथील शासकीय क्रिडा संकुल येथे १७/१०/२०१९ रोजी कार मध्ये अत्याचार केल्याची माहिती देण्यात आली आहे.दरम्यान या शिक्षकाने मुलीला ही घटना कोणाला सांगु नको असे धमकावले आहे.यानंतर मुलगी शाळेमध्ये भयभीत रहायची.ही बाब महिला शिक्षीकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी मुलीला विश्वासात घेवून सविस्तर विचारपुस केली.यानंतर मुलीने हा घडलेला धक्कादायक प्रकार शिक्षीकेला सांगितला असल्याची माहिती मिळाली आहे.मात्र शिक्षकाकडूनच अशी घटना घडल्याने पालकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
त्या मुलीने आत्महत्या केल्याची अफवा ही येत आहे पण यावर विश्वास ठेवू नका. आणि तिला न्याय मिळवून द्या
त्या मुलीने आत्महत्या केल्याची अफवा ही येत आहे पण यावर विश्वास ठेवू नका. आणि तिला न्याय मिळवून द्या
==============================
चौकट:- मटका,दारूचे व्यसन काही शिक्षकांमध्ये दिसून येत असल्याने त्यांच्यवरती कडक निर्बंध लादले पाहिजेत.शिक्षकच असे कृत्य करत असतील तर विद्यार्थ्यांच्या पालकांनी कोणावर भरोसा ठेऊन मुलं पाठवायची असा प्रश्न पालकातून निर्माण होत आहे.
===================
चौकट:-अंबाजोगाई सारख्या सुसंस्कृत शहरात घडलेल्या हया घृणास्पद प्रकाराने प्रचंड संताप व्यक्त होत आहे, या घटनेची मी तीव्र निंदा व खेद व्यक्त करते. पोलिसांनी आरोपींवर कठोर कारवाई करावी-पंकजा मुंडे,अध्यक्षा,गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान

No comments:
Post a Comment